-: दिनविशेष :-

१३ ऑगस्ट

आंतरराष्ट्रीय डावखुरे दिनEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२००४

ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.

१९९१

कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

१९६१

आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.

१९५४

रेडिओ पाकिस्तान वरुन ‘कौमी तराना’ हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.

१८९८

कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.

१६४२

क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८३

संदीपन चंदा

संदीपन चंदा – भारताचा ९ वा ग्रँडमास्टर (२००३), ओपन डच चेस चॅम्पियनशिप विजेता (२०१६, २०१७), चेस ऑलीम्पियाड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व (२००४, २००६, २००८), सर्वोच्च फिडे मानांकन २६५६ (मे २०११)

(Image Credit: ChessBase)

१९३६

वैजयंतीमाला बाली ऊर्फ ‘वैजयंतीमाला’ – चित्रपट अभिनेत्री

१९२६

फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६)

१९०६

विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९८)

१८९९

सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
(मृत्यू: २९ एप्रिल १९८०

१८९८

प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते
(मृत्यू: १३ जून १९६९)

१८९०

त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ‘बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी‘ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला.
(मृत्यू: ५ मे १९१८)

१८८८

जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक
(मृत्यू: १४ जून १९४६)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१६

बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार, राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पकृतींपासून अगदी ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाच्या सेटवरील शिल्पांपर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवली, कलाकारांचे हुबेहूब मुखवटे तयार करुन ते डमी म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला.
(जन्म: १२ ऑगस्ट १९२६)

२०००

नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका
(जन्म: ३ एप्रिल १९६५)

१९८८

गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे
(FTII) पहिले संचालक
(जन्म: २ एप्रिल १९०७)

१९८५

जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक
(जन्म: १७ सप्टेंबर १९००)

१९८०

पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
(जन्म: १२ एप्रिल १९१०)

१९१०

फ्लॉरेन्स नायटिंगेल
१८६० मधील छायाचित्र

फ्लॉरेन्स नायटिंगेल – आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका आणि संख्याशास्त्रज्ञ. १९०७ मधे त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ‘नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.
(जन्म: १२ मे १८२०)

(Image Credit: विकिपीडिया)

१९४६

एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक
(जन्म: २१ सप्टेंबर १८६६)

१९३६

मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला.
(जन्म: २४ सप्टेंबर १८६१)

१९१७

एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २० मे १८६०)

१७९५

महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.
(जन्म: ३१ मे १७२५)


Pageviews

This page was last modified on 12 May 2021 at 11:16am