हा या वर्षातील ३४१ वा (लीप वर्षातील ३४२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९८ : ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
१९९५ : फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
१९९४ : कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
१९८८ : यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
१९३५ : ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
१९१७ : पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
१८५६ : भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
१८२५ : बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५७ : जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९२१ : प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
१९०२ : जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ - अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
१९८२ : बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (जन्म: १७ जून १९०३)
१९७६ : डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)
१९४१ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ आक्टोबर १८७४)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 15 January, 2014 15:34