हा या वर्षातील १२५ वा (लीप वर्षातील १२६ वा) दिवस आहे.

       पूर्वी खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्याचे तंत्र माहित नसल्याने अनेक अडचणी येत असत. विशेषत: युद्धावरील सैनिकांचे बरेच हाल होत. हे लक्षात घेऊन सम्राट नेपोलियनने अन्न टिकवण्याचे तंत्र शोधून काढण्यासाठी तब्बल बारा हजार फ्रँकचे बक्षीसच जाहीर केले. त्यातूनच या शोधाला चालना मिळून हवाबंद डब्यात खाद्य पदार्थ साठविण्याचा शोध लागला. डबाबंद अन्न

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
१९९७ : जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९५५ : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व प्राप्त झाले.
१९३६ : इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१२६० : कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१६ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
१८१८ : कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (मृत्यू: १४ मार्च १८८३)
१४७९ : गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
  ८६७ : उडा – जपानी सम्राट (मृत्यू: १९ जुलै ९३१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६ : नौशाद अली – संगीतकार (जन्म: २५ डिसेंबर १९१९)
२००० : वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ (जन्म: ? ? ????)
१९८९ : नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९] (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ - मुंबई)
१९४३ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
१९१८ : त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ’बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले. (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)
१८२१ : फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 17 January, 2014 15:28