हा या वर्षातील १६५ वा (लीप वर्षातील १६६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.
१९७२ : डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
१९६७ : चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.
१९४५ : भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर
१९४० : जर्मनीने पॅरिस ताब्यात घेतल्यामुळे दोस्त राष्ट्रांनी तिथुन माघार घेतली.
१८९६ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ’अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.
१७८९ : मक्यापासुन पहिल्यांदाच ’व्हिस्की’ तयार करण्यात आली. तिला ’बोर्बोन’ असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील ’बोर्बोन’ येथील रहिवासी होता.
१७७७ : अमेरिकेने ’स्टार्स अँड स्ट्राइप्स’ या ध्वजाचा स्वीकार केला.
१७०४ : मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९ : स्टेफी ग्राफ – जर्मन लॉन टेनिस खेळाडू
१९२२ : के. असिफ – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (मृत्यू: ९ मार्च १९७१)
१८६८ : कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ जून १९४३)
१८६४ : अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)
१७३६ : चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१० : मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
२००७ : कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
१९८९ : सुहासिनी मुळगांवकर – अभिनेत्री व संस्कृत पंडित, मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. ३१ जानेवारी १९६० रोजी ’सौभद्र’ नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी विक्रमी ५०० प्रयोग केले. (जन्म: ????)
१९४६ : जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
१९२० : मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९१६ : गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१८२५ : पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 30 December, 2013 22:44