हा या वर्षातील १२१ वा (लीप वर्षातील १२२ वा) दिवस आहे.

       ’बोनस’ मिळणे हा हल्ली कायद्यानुसार कामगारांचा अधिकारच आहे. मात्र बोनस देण्याची प्रथा सर्वप्रथम पॅरिसमधील एका विमा कंपनीने १८२० मधे सुरू केली. ’बोनस’ या लॅटिन शब्दाचा अर्थ मात्र ’भला माणूस’ असा आहे. औद्योगिक संदर्भात त्याचा अर्थ ’भला कामगार’ असा घेतला जाऊ लागला. अशा कामगाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून जो आर्थिक लाभ दिला जाऊ लागला त्याला नाव पडले बोनस. सद्ध्या मात्र सर्वच कामगारांना बोनस देण्यात येतो.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरुन अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी १९६५ च्या नगर परिषद कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश जारी
१९९८ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ’कोकण रेल्वे’ प्रकल्प राष्ट्राला अर्पण
१९६२ : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना
१९६० : मुंबई या द्वैभाषिक इलाख्याचे विभाजन करुन महाराष्ट्र व गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.
१९६० : गुजराथ उच्‍च न्यायालयाची स्थापना
१९४० : युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
१९३० : सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लूटो असे नामकरण करण्यात आले.
१८९७ : स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
१७३९ : [वैशाख शु. ४ शके १६६१] चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१ : गॉर्डन ग्रीनीज – वेस्ट इंडियन क्रिकेटपटू
१९४४ : सुरेश कलमाडी – केंद्रीय मंत्री, आमदार व "क्रीडाप्रेमी"
१९२२ : मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)
१९३२ : एस. एम. कृष्णा – कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री, केंद्रीय परराष्ट्रमंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल
१९१९ : प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (मृत्यू: २४ आक्टोबर २०१३)
१९१५ : डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (मृत्यू: १३ आक्टोबर १९९५)
१९१३ : बलराज सहानी – अभिनेता व दिग्दर्शक (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१२१८ : रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा (मृत्यू: १५ जुलै १२९१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८ : गंगूताई पटवर्धन – स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)
१९९३ : ना. ग. ऊर्फ ’नानासाहेब’ गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
१९७२ : कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (जन्म: २३ जानेवारी १९१५)
१९४५ : जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता (जन्म: २९ आक्टोबर १८९७)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 30 January, 2015 13:38