-: दिनविशेष :-

२२ ऑगस्ट

गर्भधारणा झाल्यापासून प्राण्याचा जन्म होण्याच्या कालावधीस गर्भावधी (Gestation Period) म्हणतात. मानवामध्ये तो साधारण नऊ महिने नऊ दिवस असतो. हाच कालावधी उंदरांमध्ये २१ दिवसांचा, जिराफांमध्ये ४५० दिवसांचा, गेंड्यांमध्ये ५४८ दिवसांचा तर हत्तींमध्ये सुमारे ६३० दिवसांचा असतो!

महत्त्वाच्या घटना:

१९७२

वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्‍होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

१९६२

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

१९४४

दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

१९४२

दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९०२

कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना

१८४८

अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६४

मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू

१९५५

चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री

१९३५

पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला.
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

१९२०

डॉ. डेंटन कूली

डॉ. डेंटन कूली – हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद
(मृत्यू: १८ नोव्हेंबर २०१६)

(Image Credit: Wikipedia)

१९१९

गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी
(मृत्यू: १० जानेवारी १९९४)

१९१८

डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
(मृत्यू: १५ जुलै २००४)

१९१५

शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार
(मृत्यू: १९ मे १९९७)

१९०४

डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

वामन तुकाराम तथा सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३). त्यांच्या ‘धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
(जन्म: ? ? ????)

१९९५

पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.
(जन्म: ? ? ????)

१९८९

पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.
(जन्म: २६ जुलै १८९३)

१९८२

एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे.
(जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

१९८०

चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
(जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

१९७८

जोमो केन्याटा

जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: १२ डिसेंबर १९६४ ते २२ ऑगस्ट १९७८)
(जन्म: २० आक्टोबर १८९३)

(Image Credit: Britannica)

१८१८

वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
(जन्म: ६ डिसेंबर १७३२)

१३५०

फिलिप (सहावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: ?? १२९३)



Pageviews

This page was last modified on 18 October 2021 at 11:03pm