-: दिनविशेष :-

२६ जून

जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन

मादागास्करचा स्वातंत्र्य दिन

सोमालियाचा स्वातंत्र्य दिनEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२०००

पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

१९९९

पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.

१९९९

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९७५

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी लावण्याचा वटहुकूम जारी केला.

१९७४

नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ

१९७४

ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९६८

बालगंधर्व रंगमंदिर

पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे, आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली, भारताचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. पु. ल. देशपांडे यांनी स्वत: लक्ष घालून या रंगमंदिराची उभारणी होईल याची दक्षता घेतली. बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात आली आहे.

(Image Credit: लोकसत्ता)

१९६०

मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६०

सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१७२३

रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१

गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९१४

शापूर बख्तियार – ईराणचे शेवटचे पंतप्रधान. यानंतर इराणमध्ये हुकूमशाही स्थापित झाली.
(मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)

१८९२

पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका
(मृत्यू: ६ मार्च १९७३)

१८८८

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ – गायक व अभिनेते

जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे
असा बालगंधर्व आता न होणे ।
रतीचे तया रूप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे ।
अशा काव्यमय शब्दांत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी बालगंधर्व यांचे समर्पक वर्णन केले आहे.
(मृत्यू: १५ जुलै १९६७)

बालगंधर्व

(Image Credit: Vision of Life)

१८७४

छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक
(मृत्यू: ६ मे १९२२)

१८७३

अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ‘गौहर जान’ – गायिका व नर्तिका
(मृत्यू: १७ जानेवारी १९३०)

१८२४

लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ
(मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)

१७३०

चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ
(मृत्यू: १२ एप्रिल १८१७)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५

एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू
(जन्म: १८ मार्च १९४८)

२००४

यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता
(जन्म: ६ सप्टेंबर १९२९)

२००१

वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
(जन्म: २५ मार्च १९३२)

१९४३

कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ
(जन्म: १४ जून १८६८)

३६३

रोमन सम्राट ज्यूलियनची हत्या
(जन्म: ? ? ३३२)


Pageviews

This page was last modified on 06 May 2021 at 10:10pm