हा या वर्षातील १९३ वा (लीप वर्षातील १९४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’टिळक पुरस्कार’ जाहीर
१९९९ : ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.
१९९८ : १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
१९८५ : पी. एन. भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना
१९७९ : किरिबातीला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६२ : लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.
१९६१ : मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.
१९३५ : [आषाढ शुद्ध एकादशी - आषाढी एकादशी] ’प्रभात’चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.
१९२० : पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.
१७९९ : रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.
१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६५ : संजय मांजरेकर – क्रिकेटपटू
१९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८)
१९१३ : मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)
१९०९ : बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)
१८६४ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)
१८६४ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
१८५४ : जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२)
१८१७ : हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२)
ख्रिस्त पूर्व १०० : ज्यूलियस सीझर – रोमन सम्राट (मृत्यू: ? ? ख्रिस्त पूर्व ४२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)
२०१२ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
१९९९ : राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: २० जुलै १९२९)
१९९४ : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे वसंत साठे (आवारा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, डॉ. कोटणीसकी अमर कहानी, राम तेरी गंगा मैली) (जन्म: ? ? ????)
१६६० : बाजी प्रभू देशपांडे (जन्म: ? ? १६१५)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 4 December, 2013 12:17