हा या वर्षातील २३३ वा (लीप वर्षातील २३४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९३ : मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या 'मार्स ऑब्झर्व्हर' या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.
१९९१ : लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१८८८ : विल्यम बरोज याने बेरजा मारणार्‍या यंत्राचे पेटंट घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६ : उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू
१९६१ : व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज
१९२४ : श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (मृत्यू: ३०एप्रिल २००१)
१९३४ : सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (मृत्यू: १० मे २००१)
१९१० : नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
१९०९ : नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी (मृत्यू: १० मे २०००)
१८७१ : गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
१७८९ : ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ (मृत्यू: २३ मे १८५७)
१७६५ : विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २० जून १८३७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६ : बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (जन्म: २१ मार्च १९१६)
२००१ : शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२००१ : मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर (जन्म: ? ? ????)
२००० : विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
२००० : निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्‍नुषा (जन्म: ? ? ????)
१९९५ : सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. (जन्म: १९ आक्टोबर १९१०)
१९९१ : गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक (जन्म: २० एप्रिल १९१४)
१९८१ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ - १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक (जन्म: १ डिसेंबर १८८५ - सातारा, महाराष्ट्र)
१९७८ : विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (जन्म: १२ एप्रिल १९१७)
१९७७ : प्रेमलीला ठाकरसी – एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू
१९७६ : पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer), ’हंस पिक्चर्स’ चे एक भागीदार. ’छाया’, ’धर्मवीर’, ’प्रेमवीर (१९३७)’, ’ज्वाला (१९३८)’, ’ब्रह्मचारी’, ’ब्रँडीची बाटली (१९३९)’, ’देवता’, ’सुखाचा शोध (१९३९)’, ’लग्न पहावं करुन (१९४०)’, ’अर्धांगी (१९४०)’, ’पहिला पाळणा’, ’भक्त दामाजी (१९४२)’, ’पैसा बोलतो आहे (१९४३)’, ’रामशास्त्री (१९४४)’, ’लाखारानी (१९४५)’, ’चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)
१९४० : लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
१९३१ : ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 1 January, 2015 1:52