-: दिनविशेष :-

१९ एप्रिल

आर्यभट्ट

आर्यभट्टाने वर्षाचे कालमापन केले होते. ते ३६५ दिवस, १५ घटी, ३१ पळे व १५ विपळे भरले. कोणतीही आधुनिक साधने नसताना सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने केलेले हे वर्षाचे कालमापन जवळजवळ अचूक आहे.


महत्त्वाच्या घटना:

१९७५

‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला.

१९७१

Sierra Leone Flag

सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.

१९५६

गीतरामायणातील शेवटचे गाणे (गा बाळांनो, श्रीरामायण) पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

१९४८

ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४५

सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१५२६

मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८७

मारिया शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस खेळाडू

१९५७

मुकेश अंबानी

मुकेश अंबानी – उद्योगपती

१९३३

डिकी बर्ड

हेरॉल्ड डेनिस तथा ‘डिकी’ बर्ड – ख्यातनाम क्रिकेट पंच

(Image Credit: www.cricketdawn.com)

१९१२

ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)

१८९५

डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृततज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
(मृत्यू: ८ मे १९८१)

१८९२

ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे.
(मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)

१८६८

Rotary Club Logo

पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक
(मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१०

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार
(जन्म: ७ जून १९१३)

२००९

अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या, ६ व्या लोकसभेतील खासदार (उत्तर मध्य मुंबई). समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न व स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बलात्कारविरोधी कायदा बदलून घेतला; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत वाटे. स्त्रियांना 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी त्या आग्रही व प्रयत्नशील होत्या.
(जन्म: ८ जुलै १९२२)

२००८

सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
(जन्म: ७ जानेवारी १९२०)

१९९८

सौ. विमलाबाई गरवारे – उद्योगपत्‍नी :)
(जन्म: ? ? ????)

१९९४

मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री. पाकिस्तानच्या ‘पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ‘ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता, मी तर केवळ एक ‘पॅरो’ (चिमणी) आहे, असे त्यांनी सांगितले, आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.
(जन्म: ? ? ????)

१९९३

डॉ. उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता.
(जन्म: ????)

१९७४

आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १४ मे १९०७)

१९५५

कर्नल जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक
(जन्म: २५ जुलै १८७५)

१९१०

अनंत कान्हेरे – क्रांतिकारक
(जन्म: ? ? १८९१)

१९०६

पिअर क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १५ मे १८५९)

१८८२

चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
(जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)



Pageviews

This page was last modified on 09 September 2021 at 7:43pm