हा या वर्षातील १६० वा (लीप वर्षातील १६१ वा) दिवस आहे.

रोम जळत असताना सम्राट नीरो फिडल वाजवत होता हे सार्‍यांनाच ठाऊक आहे. पण नीरोने केवळ फिडल वाजवली एवढेच नाही, तर रोमची आग नीट दिसावी म्हणुन उंच जागेवर एक भव्य शामियाना बांधला व असे दुर्लभ दृष्य दाखविल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानत तो आनंदाने नाचला. सम्राट नीरो

महत्त्वाच्या घटना:

२००६ : १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
२००१ : भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
१९७५ : ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
१९७४ : सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
१९६४ : भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४६ : राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
१९३१ : रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.
१९२३ : बल्गेरियात लष्करी उठाव झाला.
१९०६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण
१७०० : दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
१६९६ : छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव ’शिवाजी’ असे ठेवले.
    ६८ : रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८५ : सोनम कपूर – अभिनेत्री
१९७७ : अमिशा पटेल – अभिनेत्री
१९४९ : किरण बेदी – सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी
१९१२ : वसंत देसाई – संगीतकार (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)
१६७२ : पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)
१९९५ : प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी (जन्म: ७ नोव्हेंबर १९००)
१९९३ : सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी [१९५८], दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: २२ जानेवारी १९१६)
१९८८ : गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ ’विवेक’ – अभिनेते (जन्म: ? ? ????)
१९४६ : आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १९२५)
१९०० : आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)
१८७० : चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)
१८३४ : पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)
१७१६ : बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (जन्म: १६ आक्टोबर १६७०)
   ६८ : नीरो – रोमन सम्राट (जन्म: १५ डिसेंबर ३७)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 8 February, 2014 1:17