-: दिनविशेष :-

२६ एप्रिल


महत्त्वाच्या घटना:

२००५

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबनॉनमधुन सैन्य काढुन घेतले.

१९९५

आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर किताब मिळवला. हा किताब मिळवणारी निशा ही सर्वात लहान खेळाडू ठरली.

१९८९

बांगला देशमधे एका भयंकर चक्रीवादळाने माजवलेल्या हाहा:कारात सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

१९८६

रशियातील चेर्नोबिल येथील अणूभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. हा (तोपर्यंतचा) सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यानंतरचा मोठा अपघात जपानमधील फुकुशिमा दाई इची अणूभट्टीत २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर झाला.

१९७३

अजित नाथ रे यांनी भारताचे १४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६४

टांझानियाचा ध्वज

टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश उदयास आला.

१९६२

रेंजर-४

रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

(Image Credit: NASA)

१९३३

गेस्टापो

नाझी जर्मनीच्या ‘गेस्टापो’ या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली. Gestapo हा ‘Geheime Staatspolizei’ या शब्दाचा शॉर्ट फॉर्म असून त्याचा अर्थ सरकारी गुप्त पोलीस (Secret State Police) असा आहे.

(Image Credit: Britannica)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३

मौशुमी चटर्जी
२०१२ मधील छायाचित्र

इंदिरा चट्टोपाध्याय तथा मौशुमी चटर्जी – हिंदी व बंगाली चित्रपट अभिनेत्री व राजकारणी. बालिका बधू (१९६७) या बंगाली चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. शक्ती सामंता यांनी दिग्दर्शित केलेला अनुराग (१९७२) हा त्यांचा हिंदीतील पहिला चित्रपट होय. नयना, कच्चे धागे, उस पार, बेनाम, हमशकल, रोटी कपडा और मकान, स्वर्ग - नरक, मांग भरो सजना, प्यासा सावन, ज्योती बने ज्वाला, स्वयंवर, आनंद आश्रम इ. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. २००४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी ईशान्य कोलकाता मतदारसंघातुन लोकसभेची निवडणूक लढवली. पण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सालिम यांनी त्यांचा पराभव केला. २ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

(Image Credit: विकिपीडिया)

१९०८

सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश
(मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)

१९००

चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक
(मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)

१४७९

पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य [चैत्र व. ११]
(मृत्यू: ? ? १५३१)

५७०

मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक
(मृत्यू: ८ जून ६३२ – मदिना, सौदी अरेबिया)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते
(जन्म: ९ जून १९२०)

१९८७

शंकरसिंग रघुवंशी – ‘शंकर-जयकिशन’ या गाजलेल्या संगीतकार जोडीतील संगीतकार
(जन्म: ५ आक्टोबर १९२२)

१९७६

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ – साहित्यिक (जन्म: ८ मार्च १९३०)

१९२०

श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती
(जन्म: २२ डिसेंबर १८८७)


Pageviews

This page was last modified on 26 April 2021 at 9:54am