हा या वर्षातील ३५६ वा (लीप वर्षातील३५७ वा) दिवस आहे.

         पठ्ठे बापूराव हे महाराष्ट्रातील एक थोर शाहीर व तमासगीर होते. तमासगीर होण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास मात्र विलक्षण आहे. प्रारंभी त्यांनी यंत्रविद्येचे शिक्षण घेतले. ते सोडून पोलिस खात्यात नोकरी पकडली. ते उत्कृष्ट कुस्तीगीरही होते. एक मानाची कुस्ती जिंकल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना दोनशे रुपये इनाम दिले. त्यातूनच त्यांनी तमाशाचा फड उभारला!

महत्त्वाच्या घटना:

१९९५ : प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
१८५१ : जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८८७ : श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
१६६६ : गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू: ७ आक्टोबर १७०८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (जन्म: २२ जुलै १९३७)
२००२ : दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते (जन्म: ? ? ????)
१९९६ : रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार (जन्म: ? ? ????)
१९८९ : सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक (जन्म: १३ एप्रिल १९०६)
१९७५ : पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो आँखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुँज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. (जन्म: ९ जून १९१२)
१९४५ : श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 19 February, 2014 17:36