हा या वर्षातील ३४९ वा (लीप वर्षातील ३५० वा) दिवस आहे.

       शिसे हे सजीवांच्या आरोग्याला अतिशय घातक ठरू शकते. शिशाच्या विषबाधेमुळे मेंदूवर गंभीर परिणाम होतो. प्राचीन काळी रोमन लोक शिशाच्या भांड्यांमधे पिण्याचे पाणी ठेवत असत, तसेच नळही शिशाचेच असत. त्यामुळे रोमन लोकांमधे शिशाची विषबाधा फार मोठ्या प्रमाणावर होती! शिशाची विषबाधा

महत्त्वाच्या घटना:

१९९८ : बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक
१९९१ : चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
१९७६ : सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश
१९७० : व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३५ : उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
१९३२ : टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
१९०५ : इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
१९०३ : स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
१८९२ : जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू: ६ जून १९७६)
१८५२ : हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
१८३२ : गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
  ६८७ : पोप सर्गिअस (पहिला) (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
     ३७ : रोमन सम्राट नीरो याचा जन्म (मृत्यू: ९ जून ६८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८५ : शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९००)
१९६६ : वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
१७४९ : छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 15 January, 2014 9:42