हा या वर्षातील १६६ वा (लीप वर्षातील १६७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००८ : ’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१ : ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
१९९७ : अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्यायालयाने दिला.
१९९४ : इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९९३ : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त
१९७० : बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
१९१९ : कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
१८६९ : महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.
१८४४ : चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
१६६७ : वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

प्रेमानंद गज्वी अण्णा हजारे सरोजिनी वैद्य झिया फरिदुद्दीन डागर
प्रेमानंद गज्वी अण्णा हजारे सरोजिनी वैद्य झिया फरिदुद्दीन डागर

१९४७ : प्रेमानंद गज्वी – साहित्यिक व नाटककार
१९३७ : किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक
१९३३ : सरोजिनी वैद्य – लेखिका (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)
१९३२ : झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक (मृत्यू: ८ मे २०१३)
१९२९ : सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
१९२८ : शंकर वैद्य – साहित्यिक
१९२३ : केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – साहित्यिक
१९१७ : सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (मृत्यू: २१ जुलै १९९५ - माहीम, मुंबई)
१९०७ : ना. ग. गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू: १ मे १९९३)
१८९८ : गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)

सुरैय्या शंकर वैद्य    
सुरैय्या शंकर वैद्य के. ज. पुरोहित ना. ग. गोरे

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८३ : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल १९१०)
१९७९ : सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)
१९३१ : अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, ’संदेश’कार (जन्म: ? ? १८७९)
१५३४ : योगी चैतन्य महाप्रभू (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 16 February, 2014 18:31