हा या वर्षातील २५३ वा (लीप वर्षातील २५४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
१९९६ : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ’कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा. द. सातोस्कर यांना तर ’पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर
१९६७ : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.
१९४३ : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.
१९३९ : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८४६ : एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८ : भक्ती बर्वे – अभिनेत्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)
१९१२ : बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती (मृत्यू: ७ जून २००२)
१८८७ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (मृत्यू: ७ मार्च १९६१)
१८७२ : के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९६४ : श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक (जन्म: ? ? १९२०)
१९२३ : सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (जन्म: ३० आक्टोबर १८८७)
१९०० : रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक (जन्म: ? ? ????)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 30 April, 2014 14:46