हा या वर्षातील २०७ वा (लीप वर्षातील २०८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००८ : अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.
२००५ : मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.
१९९९ : भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्‍या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड
१९९८ : १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान
१९९४ : सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर
१९६५ : मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५६ : जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
१८९१ : फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
१८४७ : लायबेरिया स्वतंत्र झाला.
१७४५ : इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.
१७८८ : न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८५ : मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल
१९७१ : खलिद महमूद – बांगलादेशी क्रिकेटपटू
१९५५ : असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष
१९५४ : व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)
१८९४ : वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू: ३० मार्च १९६९)
१८९४ : अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
१८९३ : पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)
१८७५ : कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू: ६ जून १९६१)
१८५६ : जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६)
१८९१ : राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 2 November, 2014 22:17