-: दिनविशेष :-

२१ जूनEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२००६

नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ‘निक्स’ व ‘हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

१९९९

क्रिकेट – विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.

१९९८

फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ‘फ्रिट्झ-५’ या संगणक प्रणालीचा सहज पराभव केला.

१९९५

पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ‘द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९२

विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे ‘जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक’ जाहीर

१९९१

भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६१

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९४९

राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९४८

पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे

१८९८

अमेरिकेने स्पेनकडून ‘ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.

१७८८

न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३

बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान
(मृत्यू: २७ डिसेंबर २००७)

१९५२

जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९२३

सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
(मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)

१९१६

सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख
(मृत्यू: २१ जानेवारी १९९८)

१९०५

जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: १५ एप्रिल १९८०)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार
(जन्म: १२ जून १९१७)

२००३

लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार
(जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

१९८४

मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते.
(जन्म: ४ आक्टोबर १९३५)

१९७०

सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ६ जून १९०१)

१९४०

डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष
(जन्म: १ एप्रिल १८८९)

१९२८

द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ‘नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ‘वीरधवल’, ‘रायक्लब’, ‘सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते.
(जन्म: ३ एप्रिल १८८२)


Pageviews

This page was last modified on 05 May 2021 at 2:28pm