हा या वर्षातील २४७ वा (लीप वर्षातील २४८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०१३ : रघुराम राजन यांनी ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.
२००१ : Hewlett Packard या कंपनीने संगणक क्षेत्रातील Compaq Corporation ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
१९९८ : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी ’गुगल’ची स्थापना केली.
१९७२ : मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९३७ : व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.
१९०९ : बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.
१८८८ : जॉर्ज इस्टमन याने ’कोडॅक’ हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१ : लान्स क्लूसनर – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९६२ : किरण मोरे – यष्टीरक्षक
१९५२ : ऋषी कपूर – अभिनेता
१९४१ : सुशीलकुमार शिंदे – केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
१९३७ : शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक
१९१३ : परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)
१८२५ : पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (मृत्यू: ३० जून १९१७)
१२२१ : श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (जन्म: ५ जानेवारी १९२२)
१९९७ : डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 19 February, 2014 20:37