मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्चांक गाठला गेला.
व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६’ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.
नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव’ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका
एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.
फोर्ड मोटर कंपनीची स्थापना
आर्या आंबेकर – गायिका
अरविंद केजरीवाल – ‘आम आदमी पार्टी’चे संस्थापक, दिल्लीचे मुख्यमंत्री, समाजसेवक व सनदी अधिकारी
अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी
(मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)
हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)
अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता
(मृत्यू: १७ जुलै १७९०)
हेल्मुट कोल्ह – जर्मन चॅन्सेलर (१९८२ - १९८८)
(जन्म: ३ एप्रिल १९३०)
शुद्धमती तथा ‘माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री
(जन्म: ? ? ????)
श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट
(जन्म: ३ जुलै १९१२)
आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ‘बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस
नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ‘मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत.
(जन्म: २ ऑगस्ट १८६१)
देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ‘चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात
आले आहे.
(जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)