हा या वर्षातील १९७ वा (लीप वर्षातील १९८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९८ : गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.
१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
१९६५ : ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
१९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी
  ६२२ : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८४ : कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
१९७३ : शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू
१९६८ : धनराज पिल्ले – हॉकी पटू
१९४३ : प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
१९२३ : के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
१९१७ : जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८)
१९१४ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
१९१३ : स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ - अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
१९०९ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
१७७३ : सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ - लंडन, इंग्लंड)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९३ : उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: ? ? १९०९)
१९८६ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
१३४२ : चार्ल्स (पहिला) – हंगेरीचा राजा (जन्म: ? ? १२८८)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 15 January, 2014 12:06