हा या वर्षातील १६२ वा (लीप वर्षातील १६३ वा) दिवस आहे.

तरुण वयातच जग जिंकणारा सिकंदर ऊर्फ अलेक्झांडर द ग्रेट हा खरोखरीच एक उमदा सम्राट होता. शरण आलेल्या अनेक राजांना त्याने सन्मानाने वागवले. कट्टर शत्रू असलेल्या इराणचा सम्राट डरायस याच्या निधनाची वार्ता कळताच आपल्याला प्रबळ विरोधक राहिला नाही म्हणून अलेक्झांडर ओक्साबोक्शी रडला! अलेक्झांडर द ग्रेट

महत्त्वाच्या घटना:

२००७ : बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
१९९७ : पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
१९७२ : दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.
१९७० : अ‍ॅना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९३७ : जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.
१९०१ : न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१८६६ : अलाहाबाद उच्‍च न्यायालयाची स्थापना
१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४७ : लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
१८९७ : राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१८९४ : काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २७ मार्च १९५२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)
१९९७ : मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)
१९८३ : घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (जन्म: १० एप्रिल १८९४)
१९५० : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)
१९२४ : वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)
१७२७ : जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा. याला इंग्लिश आजिबात येत नसे व तो दुभाषांमार्फत दरबार्‍याशी संपर्क साधत असे किंवा लॅटिनमध्ये त्याचे म्हणणे मांडत असे. (जन्म: २८ मे १६६०)
ख्रिस्त पूर्व ३२३ : अलेक्झांडर द ग्रेट – मॅसेडोनियाचा राजा (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 6 March, 2014 15:20