हा या वर्षातील ३२ वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००४ : मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
१९९२ : भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.
१९८१ : ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
१९७९ : १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
१९६६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
१९६४ : प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५६ : सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४६ : नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
१९४१ : डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
१८९३ : थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८३५ : मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
१६८९ : गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१ : अजय जडेजा – क्रिकेटपटू
१९६० : जॅकी श्रॉफ – अभिनेता
१९३१ : बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)
१९२९ : जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
१९२७ : मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ - सांगली)
१९१७ : ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
१९१२ : राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
१९०१ : क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)
१८८४ : ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
१८६४ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)
२००३ : कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१)
१९९५ : मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
१९७६ : वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 26 January, 2015 23:01