हा या वर्षातील २३८ वा (लीप वर्षातील २३९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९६ : दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर
१९७२ : पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे २० व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९४४ : दुसरे महायुद्ध - चार्ल्स द गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.
१८८३ : डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.
१७६८ : कॅप्टन जेम्स कूक एच. एम. एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
१४९८ : मायकेल अँजेलो याने ’पिएटा’ या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
१३०३ : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४४ : अनिल अवचट – लेखक व सामाजिक कार्यकर्ते
१९२७ : बी. व्ही. दोशी – प्रख्यात वास्तुविशारद
१९२२ : ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. ’स्वातंत्र्य संग्रामाचे महाभार’, ’लोकमान्य टिळक’, हाजी पीर’, ’सोनार बांगला’, ’भाकरी आणि स्वातंत्र्य’ इ. मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: २९ मे २०१०)
१९१० : मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)
१७४३ : अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक (मृत्यू: ८ मे १७९४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)
१९९९ : नरेन्द्रनाथ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू (जन्म: ? ? ????)
१९७४ : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९४८ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)
१७२३ : अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २४ आक्टोबर १६३२)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 17 February, 2014 21:21