व्ही. शांताराम ‘प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.
जालियनवाला बाग हत्याकांड – रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसर येथे झालेल्या सभेवर ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल हॅरी डायर याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केलेल्या गोळीबारात ३७९ लोक ठार व सुमारे १२०० लोक जखमी झाले. [चैत्र शु. १३]
हंगेरी प्रजासत्ताक बनले.
छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. [चैत्र व. २]
गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू, ग्रॅण्डमास्टर
सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
नजमा अकबर अली हेपतुल्ला – उपराष्ट्रपती, मणिपूरच्या राज्यपाल, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू, भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष, ६ वेळा राज्यसभा खासदार
म्वालीमू ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १४ आक्टोबर १९९९)
सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक
(मृत्यू: २२ डिसेंबर १९८९)
ब्रूनो बेनेडेट्टो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९९३ - केम्ब्रिज, मॅसेच्युसेटस, यू. एस. ए.)
वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
(मृत्यू: २९ आक्टोबर १९७८)
रामचंद्र गोपाळ ऊर्फ ‘दादासाहेब तोरणे’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक
(मृत्यू: १९ जानेवारी १९६०)
थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपराष्ट्राध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात.
(मृत्यू: ४ जुलै १८२६)
विश्वास नरहर तथा ‘बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
(जन्म: १९ डिसेम्बर १९३२)
विश्वास सरपोतदार यांच्यावर ‘महाराष्ट्र नायक’ने तयार केलेली ही छोटी क्लिप पहा:
डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ? ? ????)
हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी
बलराज सहानी – अभिनेता व दिग्दर्शक
(जन्म: १ मे १९१३ – रावलपिन्डी, पाकिस्तान)
अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथात रघुनाथपंडित कृत ’दमयंती स्वयंवर’ व मुक्तेश्वरकृत ’महाभारताचे आदिपर्व’ हे उल्लेखनीय आहेत.
(जन्म: ५ सप्टेंबर १८९५)
भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
(जन्म: २४ आक्टोबर १८६८)
This page was last modified on 27 October 2021 at 10:11pm