-: दिनविशेष :-

२५ जानेवारी

राष्ट्रीय मतदार दिन


महत्त्वाच्या घटना:

२००१

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ‘भारतरत्‍न’

१९९५

अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ‘न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!

१९९१

मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्‍न’

१९८२

आचार्य विनोबा भावे यांना ‘भारतरत्‍न’

१९७१

हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

१९४१

‘प्रभात’चा ‘शेजारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९१९

पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

१८८१

थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

१७५५

मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५८

कविता कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका

१९३८

सुरेश खरे – नाटककार व समीक्षक

१८८२

व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका
(मृत्यू: २८ मार्च १९४१)

१८७४

डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
(मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)

१८६२

रमाबाई रानडे – ‘सेवा सदन‘च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या
(मृत्यू: ? ? १९२४)

१७३६

जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ
(मृत्यू: १० एप्रिल १८१३)

१६२७

रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१५

मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(जन्म: १ फेब्रुवारी १९२७ - हातकणंगले)

२००१

विजयाराजे शिंदे – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या
(जन्म: ? ? १९१९)

१९९६

प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते
(जन्म: ? ? ????)

१९८०

लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ‘दाते पंचांग’कर्ते
(जन्म: २९ सप्टेंबर १८९०)

१६६५

सोनोपंत डबीर
(जन्म: ? ? ????)



Pageviews

This page was last modified on 28 September 2021 at 8:22pm