ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
महाडचा ‘चवदार तळे’ सत्याग्रह
अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.
डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
कंगना राणावत – सिनेकलाकार
अलका याज्ञिक – पार्श्वगायिका
वसंत कानेटकर – नाटककार
(मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता
(मृत्यू: २१ मार्च १९८५)
हेन्रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी
(मृत्यू: २३ मे १९०६)
कृष्णराव गणपतराव साबळे तथा ‘शाहीर‘ साबळे – महाराष्ट्र शाहीर. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आपल्या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन ते घडवत असत. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली होती
(जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
(जन्म: १ डिसेंबर १९०९)
लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
(जन्म: ११ जानेवारी १८५९)
सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कलन ’ (Calculus) या शाखेचे जनक
(जन्म: २५ डिसेंबर १६४२)
This page was last modified on 31 August 2021 at 3:19pm