हा या वर्षातील ३०४ वा (लीप वर्षातील ३०५ वा) दिवस आहे.

       पंतप्रधान, राष्ट्रपती अशा उच्‍च पदावरील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर देशात दुखवटा पाळला जातो. हा प्रकार भारतात फार पुर्वीपासून प्रचलित आहे. मोगल बादशहांच्या काळात एखादा सरदार मरण पावल्यावर त्या दिवशी सरकारी कामकाज बंद ठेवले जाई, तर बादशहाच्या मृत्यूनंतर मोठ्या शहरांत दहा दिवस हरताळ पाळण्यात येई.

महत्त्वाच्या घटना:

१९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
१९८४ : भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
१९६६ : दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना
१९४१ : ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
१९२० : नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
१८८० : धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१८७६ : भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
१८६४ : नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४६ : रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)
१८९५ : सी. के. नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)
१८७५ : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
१३९१ : एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार आणि रसरंग दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्यांनी १९४० मध्ये संत ज्ञानेश्वर या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकले. भालजी पेंढारकर यांच्या थोरातांची कमळा या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. राजा परांजपे यांच्या ’ऊन पाऊस’ या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध महिलेची भूमिका केली होती. या भूमिकेचे आजही प्रचंड कौतुक होते. संत ज्ञानेश्वर (१९४०), थोरातांची कमळा (१९४१), माझे बाळ (१९४३), शरबती आँखे (१९४५), संतान (१९४६), वीर घटोत्कच (१९४९), नंद किशोर (१९५१), शिव लिला (१९५२), श्यामची आई (१९५३), ऊन पाऊस (१९५४), समाज (१९५४), शेवग्याच्या शेंगा (१९५५), कारिगर (१९५८), मौसी (१९५८), कीचक वध (१९५९), वक्त (१९६५), सज्जो रानी (१९७६), हरे काच की चुडिया (१९६७), परिवार (१९६८), प्रार्थना (१९६९), अधिकार (१९७१), जलते बदन (१९७३), पेसै की गुडिया (१९७४), आदमी सडक का (१९७७), फासी का फंदा (१९८६), पवनाकाठचा धोंडी ,शेवटचा मालूसरा, कुंकवाचा करंडा, दाम करी काम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. मराठी चित्रपटांप्रमाणेच 'लग्नाची बेडी', 'घराबाहेर', 'संशयकल्लोळ' इत्यादी नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. (जन्म: ? ? १९१९)
२००५ : अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ‘कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ‘रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: ३१ ऑगस्ट १९१९ - गुजरानवाला, पंजाब (पाकिस्तान)
१९८६ : आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)
१९८४ : भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
१९७५ : सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (जन्म: १ आक्टोबर १९०६)
१८८३ : मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ - तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 31 October, 2014 15:07