-: दिनविशेष :-

२५ ऑगस्ट


महत्त्वाच्या घटना:

२००१

सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर

१९९८

एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

१९९७

कर्नाटकातील दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन ‘उडुपी’ हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.

१९९१

लिनस ट्रोव्हाल्डस याने ‘लिनक्स’ (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

१९९१

बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

१९९१

एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

१९८०

झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९६०

इटलीतील रोम येथे १७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९४४

दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

१९१९

जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन आणि पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.

१८२५

उरुग्वेने आपण (ब्राझिलपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

१६०९

गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६२

डॉ. तस्लिमा नसरीन – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका

१९५७

सिकंदर बख्त – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज

१९५२

दुलीप मेंडिस – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९४१

अशोक पत्‍की – संगीतकार

१९३०

शॉन कॉनरी – ’जेम्स बॉन्ड’च्या भूमिकांमुळे गाजलेला स्कॉटिश अभिनेता व निर्माता

१९२३

गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव
(जन्म: ५ ऑगस्ट
१९३०)

२००८

सईद अहमद शाह ऊर्फ ‘अहमद फराज‘ – ऊर्दू शायर
(जन्म: १२ जानेवारी १९३१)

२००१

डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी – संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक. त्यांचे ‘धुळाक्षरातून मुळाक्षराकडे‘ हे आत्मचरित्र एका वेगळ्या स्वरुपामुळे गाजले.
(जन्म: ? ? ????)

२०००

कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ‘डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार
(जन्म: २७ मार्च १९०१)

१९०८

हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
(जन्म: १५ डिसेंबर १८५२)

१८६७

मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २२ सप्टेंबर १७९१)

१८२२

विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला.
(जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)

१८१९

जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता
(जन्म: १९ जानेवारी १७३६)

१२७०

लुई (नववा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २५ एप्रिल १२१४)


Pageviews

This page was last modified on 25 April 2021 at 12:40pm