हा या वर्षातील २१९ वा (लीप वर्षातील २२० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१९९८ : अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९९७ : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा ’व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर
१९९१ : जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी
१९८१ : सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ’द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.
१९४७ : मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
१९४७ : थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९४२ : दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ’ग्वाडेल कॅनाल’ येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८ : ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९२५ : डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन – भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री, हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जगभरातील सुमारे ४२ विद्यापीठांनी त्यांना ’डॉक्टरेट’ ही पदवी दिली आहे. याखेरीज पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या सन्मानांखेरीज, रॅमन मॅगसेसे, वर्ल्ड फूड प्राइझ व इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
१९१२ : केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ (मृत्यू: ? ? ????)
१८७६ : माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (मृत्यू: १५ आक्टोबर १९१७)
१८७१ : अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९७४ : अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ? ? ????)
१९४१ : रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१)
१८४८ : जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 22 January, 2014 13:58