-: दिनविशेष :-

२४ फेब्रुवारी

क्षयरोग निवारण दिन
जागतिक मुद्रण दिन
इस्टोनियाचा स्वातंत्र्य दिन
केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस

महत्त्वाच्या घटना:

२०१०

एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

१९८७

इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात ‘१९८७ - ए’ या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

१९६१

मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

१९५२

कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

१९४२

व्हॉइस ऑफ अमेरिका

व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

१९३८

ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

१९२०

नाझी पार्टीची स्थापना झाली.

१९१८

इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८२२

जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

१६७०

राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

स्टीव्ह जॉब्ज
१९७२ मधील छायाचित्र

स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
(मृत्यू: ५ आक्टोबर २०११)

(Image Credit: Wikipedia)

१९४८

जे. जयललिता – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, एआयएडीएमके या राजकीय पक्षाच्या नेत्या, प्रसिद्ध अभिनेत्री
(मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)

१९३९

जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
(मृत्यू: ९ मार्च २०१२)

१९२४

तलत महमूद

तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा
(मृत्यू: ९ मे १९९८ - मुंबई, महाराष्ट्र)

(Image Credit: talatmahmood.net)

१६७०

राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव
(मृत्यू: २ मार्च १७००)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

अनंत पै ऊर्फ ‘अंकल पै’ – ‘अमर चित्र कथा’ चे जनक
(जन्म: १७ सप्टेंबर १९२९)

१९९८

ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या
(जन्म: १८ एप्रिल १९१६)

१९८६

रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका
(जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)

१९७५

निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष
(जन्म: ३० मार्च १८९५)

१९३६

लक्ष्मीबाई टिळक – ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे.
(जन्म: ? ? १८६८)

१८१५

रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला.
(जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ - लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)

१८१०

हेन्‍री कॅव्हँडिश

हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि अरगॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, पृथ्वीची घनता मोजणारा पहिला शास्त्रज्ञ
(जन्म: १० आक्टोबर १७३१)

(Image Credit: Alchetron)

१६७४

कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.
(जन्म: ? ? ????)



Pageviews

This page was last modified on 09 October 2021 at 11:37pm