हा या वर्षातील ३२३ वा (लीप वर्षातील ३२४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
१९९९ : शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
१९९८ : व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ’द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
१९९८ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
१९६९ : फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.
१९६९ : ’अपोलो-१२’ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
१९६० : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
१९४६ : अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
डॉ. मोहम्मद युनूस व्हिन्सेंट व्हॅन गॉग बिल क्लिंटन पेले
डॉ. मोहम्मद युनूस व्हिन्सेंट व्हॅन गॉग बिल क्लिंटन पेले

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

सुश्मिता सेन झीनत अमान दारा सैंग इंदिरा गांधी
सुश्मिता सेन झीनत अमान दारा सिंग इंदिरा गांधी
१९७५ : सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
१९५१ : झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०
१९२८ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१२)
१९२२ : सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ - मुंबई)
१९१७ : इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)
१९१४ : एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
१९०९ : पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)
१८९७ : स. आ. जोगळेकर – चतुरस्त्र साहित्यिक (मृत्यू: ? ? ????)
१८८८ : जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (मृत्यू: ८ मार्च १९४२)
१८७५ : देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खांब बाबा पिलर’ हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन
(मृत्यू: १३ मे १९५०)
१८३८ : केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)
१८३१ : जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
१८२८ : मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी (मृत्यू: १८ जून १८५८)
एकनाथजी रानडे पीटर ड्रकर कॅपाब्लांका देवदत्त रामकृष्ण भांडारकर
एकनाथजी रानडे पीटर ड्रकर कॅपाब्लांका दे. रा. भांडारकर

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९ : रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (जन्म: ????)
१९७१ : कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्‍या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ’डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती. (जन्म: ? ? ????)
१८८३ : सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: ४ एप्रिल १८२३)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 5 March, 2014 14:57