हा या वर्षातील २७४ वा (लीप वर्षातील २७५ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.
१९६० : नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५९ : भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५८ : भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९४६ : युनायटेड किंग्डममधे ’मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची ची स्थापना झाली.
१९४३ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१८९१ : स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना
१८८० : थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१८३७ : भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
१७९१ : फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३० : जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९) (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)
१९२८ : विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (मृत्यू: २१ जुलै २००१)
१९२४ : जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
१९१९ : गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
१९१९ : मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २०००)
१९०६ : सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)
१८९५ : लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१)
१८८१ : विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)
१८४७ : अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१") (जन्म: ?? १९६१)
१९३१ : शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९)
१८६८ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा (जन्म: १८ आक्टोबर १८०४)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 2 March, 2014 23:35