हा या वर्षातील २४८ वा (लीप वर्षातील २४९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
२००० : ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर
१९६७ : ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.
१९४१ : इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९३२ : फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४० : रॅक्‍वेल वेल्श – अमेरिकन अभिनेत्री
१९२८ : दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)
१९२० : लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)
१९०७ : जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)
१८९५ : अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथात रघुनाथपंडित कृत ’दमयंती स्वयंवर’ व मुक्तेश्वरकृत ’महाभारताचे आदिपर्व’ हे उल्लेखनीय आहेत. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१८८८ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
१६३८ : लुई (चौदावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)
११८७ : लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)
१९९५ : सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ - चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)
१९९२ : अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: ? ? ????)
१९९७ : मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)
१९९१ : शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म: २१ मे १९३१)
१९७८ : रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. ’रात्र’ आणि ’उत्तररात्र’ हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले. मुंबई आकाशवाणीवरील ’वार्‍यावरची वरात’ व ’मेघदूत’ या श्राव्य नियतकालिकांचे ते निर्माते व लेखक होते. (जन्म: ? ? १९०८)
१९१८ : सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: २० जानेवारी १८७१)
१९०६ : लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 2 May, 2014 14:06