हा या वर्षातील २५५ वा (लीप वर्षातील २५६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
१९९८ : डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
१९८० : तुर्कस्तानमधे लष्करी उठाव
१९५९ : ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.
१९४८ : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अ‍ॅक्शन’ असे केले जाते.
१९३० : विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
१६६६ : आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

प्रेमानंद गज्वी अण्णा हजारे सरोजिनी वैद्य झिया फरिदुद्दीन डागर
मॅक्स वॉकर फिरोझ गांधी आयरिन क्यूरी विभूतीभूषण बंदोपाध्याय

१९४८ : मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू (मृत्यू: ????)
१९१२ : फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
१८९७ : आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ मार्च १९५६)
१८९४ : विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. ’इच्छामती’ या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६ : पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले. (जन्म: ? ? ????)
१९९६ : पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब' असे छापले जात असे. (जन्म: ७ जुलै १९४८)
१९८० : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
१९८० : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.  (जन्म: २ मार्च १९२५)
१९७१ : जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
१९९२ : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
१९५२ : रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
१९२६ : विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि ’महाराष्ट्र सारस्वत’ या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक, १८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. (जन्म: ? ? १८७१)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 1 March, 2014 16:25