हा या वर्षातील ३३५ वा (लीप वर्षातील ३३६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.
१९९९ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
१९९३ : प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ’डी. लिट. पदवी’ जाहीर
१९९२ : कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर
१९९२ : ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.
१९८८ : बेनझीर भूट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली.
१९८१ : AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
१९७६ : अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७३ : पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९६५ : भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना
१९६४ : मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९६३ : नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
१९४८ : एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
१९१७ : कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८० : मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू
१९६३ : अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक
१९५५ : उदित नारायण – पार्श्वगायक
१९११   अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (मृत्यू: ४ आक्टोबर १९६६)
१९०९ : बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू: २० मार्च १९५६)
१८८५ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ - १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ - संनिधि आश्रम, नवी दिल्ली)
१७६१ : मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (मृत्यू: १६ एप्रिल १८५०)
१०८१ : लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (जन्म: १८ ऑगस्ट १९००)
१९८८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (जन्म: २ आक्टोबर १९०८)
१९८५ : शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म: १८ जून १८९९)
१८६६ : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म: ४ जुलै १७९०)
११३५ : हेन्‍री (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: ? ? १०६८)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 2 May, 2014 14:52