हा या वर्षातील १२९ वा (लीप वर्षातील १३० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
१९९९ : ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९५५ : पश्चिम जर्मनीचा ’नाटो’ (North Atlantic Treaty Organisation) मधे प्रवेश
१९३६ : इटलीने इथिओपिया बळकावले.
१८७४ : मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम सुरू झाल्या. ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२८ : वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१०)
१८८६ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ - पुणे)
१८६६ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)
१८१४ : दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक, संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (मृत्यू: १७ आक्टोबर १८८२)
१५४० : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : पं. फिरोझ दस्तूर – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ? ? ????)
१९९९ : करमसीभाई जेठाभाई सोमय्या – उद्योगपती (जन्म: ? ? ????)
१९९८ : तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ - लखनौ, उत्तर प्रदेश)
१९९५ : अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)
१९८६ : शेर्पा तेनसिंग नोर्गे – एव्हरेस्टवीर (जन्म: २९ मे १९१४)
१९५९ : कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)
१९३१ : अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: १९ डिसेंबर १८५२)
१९१९ : रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (जन्म: ६ डिसेंबर १८६१)
१३३८ : [वैशाख व. ५ शके १२६०] भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 31 March, 2014 14:59