हा या वर्षातील ९६ वा (लीप वर्षातील ९७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : ’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.
१९९८ : भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९९८ : स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
१९८० : भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!
१९६६ : भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.
१९६५ : व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला ’अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला. या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली.
१९३० : प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. [चैत्र शु. ८]
१९१७ : पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८९६ : आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१६५६ : शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. [चैत्र व. ७]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६ : दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू व प्रबंधक
१९३१ : रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ - कोलकता, पश्चिम बंगाल)
१९२८ : जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ
१९२७ : विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (मृत्यू: २८ जून २०००)
१९१९ : रघुनाथ विष्णू पंडित – कोंकणी कवी (मृत्यू: ? ? ????)
१९१७ : ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)
१९०९ : जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (मृत्यू: २२ सप्टॆंबर १९९४)
१८९० : अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)
१८६४ : सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)
१७७३ : जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ जून १८३६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९२ : आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)
१९८९ : पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. (जन्म: ७ मे १९१२ - मांडली, डुंगरपूर, राजस्थान)
१९८३ : जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण (जन्म: १० जून १९०८)
१९८१ : शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
१९५५ : विनायक महाराजा मसूरकर – धर्मभास्कर
११९९ : रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 4 March, 2014 22:55