हा या वर्षातील ३४० वा (लीप वर्षातील ३४१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
१९९९ : जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९२ : अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
१९८१ : डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
१९७८ : स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
१९७१ : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
१९१७ : फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
१८७७ : द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३२ : कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
१९२३ : वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
१९१६ : ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
१८६१ : रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)
१८५३ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
१८२३ : मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
१७३२ : वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
१४२१ : हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)
१९७६ : क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
१९७१ : कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (जन्म: १ जानेवारी १९०२)
१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 3 March, 2014 18:24