हा या वर्षातील ३२२ वा (लीप वर्षातील ३२३ वा) दिवस आहे.

       लिनिअस पॉलिंग या शास्त्रज्ञाने ’क’ जीवनसत्त्वाचे भरपूर प्रमाणात सेवन हा सर्दीवर रामबाण उपाय असल्याचे १९७० मधे प्रयोगांती सिद्ध केले. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. ’क’ जीवनसत्त्वाच्या सेवनाने सर्दीला प्रतिबंध मात्र करता येत नाही असे अलीकडे लक्षात येऊ लागले आहे.
       सर्दी हे कार्यालय व शाळा यातील अनुपस्थितीचे सर्वात मोठे कारण आहे.
क जीवनसत्त्व

महत्त्वाच्या घटना:

१९९३ : दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
१९९२ : ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६२ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
१९५५ : भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
१९३३ : ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.
१९२८ : वॉल्ट डिस्‍ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
१९१८ : लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९०५ : लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
१८८२ : अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.
१८०९ : फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५ : महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
१९३१ : श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य (मृत्यू: ? ? १९८६)
१९१० : बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५)
१९०१ : व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
१८९८ : प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६ : ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
२००१ : नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली. (जन्म: ? ? १९१९ - खांडवा, मध्य प्रदेश)
१९९९ : रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ’कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी (जन्म: ? ? ????)
१९९८ : रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्‍याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक (जन्म: ? ? ????)
१९९६ : कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: ? ? ????)
१९९३ : पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
१९६२ : नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५)
१७७२ : माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 18 December, 2014 15:38