हा या वर्षातील १७१ वा (लीप वर्षातील १७२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७ : ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९६० : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना
१९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना
१८९९ : केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७ : देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८६३ : वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.
१८३७ : व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२ : पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू
१९५४ : अ‍ॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू
१९३९ : रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)
१९२० : मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)
१९१५ : टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)
१८६९ : लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)
१९९७ : वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म: ? ? १९०८)
१९९७ : बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? १९३४)
१८३७ : विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१६६८ : हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म: १८ डिसेंबर १६२०)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 11 November, 2013 21:07