हा या वर्षातील २८६ वा (लीप वर्षातील २८७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९७० : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९४६ : फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१९४४ : दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१९२९ : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.
१९२३ : मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.
१८८४ : लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
    ५४ : नीरो १७ व्या वर्षी रोमन सम्राट बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८ : नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)
१९४१ : जॉन स्‍नो – इंग्लिश क्रिकेटपटू
१९२५ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)
१९११ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (मृत्यू: १० डिसेंबर २००१)
१८७७ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (मृत्यू: ६ मे १९४६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१ : डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,
१९९५ : डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५ - किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)
१९८७ : आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९४५ : मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
१९११ : मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (जन्म: २८ आक्टोबर १८६७)
१२४० : रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती (जन्म: ?? १२०५)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 21 January, 2014 17:33