-: दिनविशेष :-

१२ जून

जागतिक बालकामगार विरोधी दिन

फिलिपाइन्सचा स्वातंत्र्य दिन


महत्त्वाच्या घटना:

२००१

कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील ‘वूमन ग्रॅंडमास्टर’ बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

१९९६

एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.

१९९३

पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी

१९७५

अलाहाबाद न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.

१९६४

वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

१९४४

दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९४०

दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९१३

जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.

१९०५

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

१८९८

स्वातंत्र्याचा जाहीरनामा
५ पेसोच्या नोटेवरील स्वातंत्र्याचा जाहीरनामा

फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले. पण १९०२ मध्ये पॅरिस करारान्वये स्पेनकडून अमेरिकेने हा देश ताब्यात घेतला आणि मानिला करारानुसार ४ जुलै १९४६ रोजी तो पुन्हा स्वतंत्र झाला. तरी पण १२ जून हाच दिवस फिलिपाइन्समध्ये स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

(Image Credit: विकिपीडिया)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५७

जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक

१९२९

अ‍ॅन फ्रँक – ‘द डायरी ऑफ अ‍ॅन फ्रॅंक’ या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेली जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी
(मृत्यू: ?? मार्च १९४५)

१९१७

भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार
(मृत्यू: २१ जून २०१२)

१८९४

पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले.
(मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००३

ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता (जन्म: ५ एप्रिल १९१६)

२०००

पु. ल. देशपांडे तथा ‘पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

१९८३

नॉर्मा शिअरर – कॅनेडियन-अमेरिकन अभिनेत्री
(जन्म: १० ऑगस्ट १९०२)

१९८१

प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश
(जन्म: १६ मार्च १९०१)

१९६४

कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ
(जन्म: ५ जानेवारी १८९२ - इस्लामपूर, सांगली)