हा या वर्षातील ९९ वा (लीप वर्षातील १०० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९५ : लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्‍न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
१९९४ : सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९६७ : बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७ : रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ’एक’ मताने मंजुरी मिळाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८ : जया भादुरी – अभिनेत्री
१९२५ : लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (मृत्यू: २१ आक्टोबर १९९५)
१८९३ : राहूल सांकृतायन – इतिहासकार (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१८८७ : विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ आक्टोबर १९५०)
१८२८ : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (मृत्यू: २५ जुलै १८८०)
१३३६ : तैमूरलंग – मंगोल सरदार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९ : अशोकजी परांजपे – गीतकार (जन्म: ? ? ????)
२००१ : बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ’आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३०)
२००१ : शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ११ जुलै १९२१)
१९९८ : डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: २२ जून १९०८)
१९९४ : चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (जन्म: ? ? १९१४)
१६९५ : [वैशाख शु. ६ शके १६१७] पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली. भर्तृहरीच्या शतकत्रयीचा अनुवाद आणि यथार्थदीपिका ही गीतेवरील टीका हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? १६०७)
१६२६ : सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (जन्म: २२ जानेवारी १५६१)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 25 July, 2014 12:55