-: दिनविशेष :-

१७ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

२००८

कोसोव्होने (सर्बियापासून) स्वातंत्र्य जाहीर केले.

१९७९

अमेरिकेबरोबरचे युद्ध संपल्यानंतर व्हिएतनामने चीनऐवजी सोविएत युनियन बरोबर राजनैतिक संबंध अधिक वाढवले. व्हिएतनामच्या या चीनविरोधी व सोविएत युनियन धार्जिण्या डावपेचांमुळे चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले. १६ मार्च १९७९ रोजी चीनने आपले सैन्य काढून घेतले. दोन्ही देशांनी आपणच विजयी झाल्याचे घोषित केले.

१९६४

अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

१९३३

अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.

१९२७

वामन गोपाळ जोशी लिखित ‘संगीत रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८०१

इ. स. १८०० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली होती. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

पॅरिस हिल्टन
२००९ मधील छायाचित्र

पॅरिस हिल्टन – अमेरिकन मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि उद्योजक

(Image Credit: Wikipedia)

१९६३

मायकेल जॉर्डन
१९९६: Philadelphia 76ers विरुद्ध

मायकेल जॉर्डन – अमेरिकन बास्केटबॉलपटू, अभिनेता आणि उद्योजक

(Image Credit: The Guardian)

१८७४

थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष
(मृत्यू: १९ जून १९५६)

१८५४

फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)

१७४०

होरॅस-बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
(मृत्यू: २२ जानेवारी १७९९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८६

जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ
(जन्म: ११ मे १८९५)

१९७८

पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक
(जन्म: २ ऑगस्ट १९१०)

१८८३

राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन
(जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)

१८८१

लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ‘लहुजी वस्ताद’ – क्रांतिकारी, समाजसेवक
(जन्म: ? ? १८११)

१६००

सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्‍या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
(जन्म: ? ? १५४८)