हा या वर्षातील ११२ वा (लीप वर्षातील ११३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००६ : प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या.
१९९७ : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर
१९४८ : अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६ : क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२९ : प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक (मृत्यू:
१९२९ : उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (मृत्यू: ९ मार्च २००० - नाशिक)
१९१६ : काननदेवी – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९१६ : यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (मृत्यू: १२ मार्च १९९९)
१९०४ : जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
१८७० : व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
१८१२ : लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
१७२४ : एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)
१६९८ : [वैशाख व. ७, शके १६२०] शिवदिननाथ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष (मृत्यू: ? ? ????)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
२०१३ : जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३)
२००३ : बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, ‘थिएटर ऑफ इंडिया’ आणि ’फोक थिएटर ऑफ इंडिया’ या पुस्तकांचे लेखक (जन्म: ४ डिसेंबर १९१६ - भटिंडा, पंजाब)
१९९४ : आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य (जन्म: ? ? ????)
१९९४ : रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३)
१९८० : फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 17 January, 2014 13:11