अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे (ISS) झेपावले.
‘ग्रँड प्रिन्सेस’ या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
पं. नेहरूंच्या निधनानंतर गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान (हंगामी) म्हणून कार्यभार स्वीकारला. (कार्यकाल: २७ मे १९६४ ते ९ जून १९६४)
मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘तारापोरवाला अॅक्वेरिअम’चे उद्घाटन झाले.
(Image Credit: @mumbaiheritage)
दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.
त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर - १०४६ फूट) असलेल्या ‘ख्रायसलर सेंटर’ या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्घाटन झाले. या इमारतीने आयफेल टॉवरला मागे टाकले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना
अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
महेला जयवर्धने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
मायकेल हसी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे – कादंबरीकार, कवी, इंग्रजी व मराठी साहित्याचे विलक्षण अभ्यासक व मर्मग्राही समीक्षक. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. पद्मश्री, साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
हेन्री किसिंजर – मुत्सद्दी, राजकारणी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, नोबेल पारितोषिक विजेते
कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक
(मृत्यू: ११ मे २००४)
मिनोचर रुस्तुम तथा ‘मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते
(जन्म: २० नोव्हेंबर १९०५)
लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या
शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली.
(जन्म: २७ जानेवारी १९०१)
अरविंद मंगरुळकर – संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न [१९५५]
(जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)
रमाबाई भीमराव आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी
(जन्म: ? ? १८९६)
डॉ. हाईनरिक हर्मन रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर. त्यांनी २४ मार्च १८८२ रोजी क्षय रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा (Mycobacterium Tubercule) शोध लावला. त्या काळात सुमारे पाच सहा टक्के लोक क्षय रोगाने दगावत असत.
(जन्म: ११ डिसेंबर १८४३)
(Image Credit: Wikipedia)
This page was last modified on 10 September 2021 at 6:54pm