-: दिनविशेष :-

घानाचा स्वातंत्र्यदिन


महत्त्वाच्या घटना:

२०००

शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब

१९९९

जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्‍घाटन

१९९८

विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

१९९७

पांडुरंगशास्त्री आठवले

स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड

(Image Credit: Templeton Prize)

१९९२

‘मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू (Computer Virus) पसरण्यास सुरूवात झाली.

१९७५

इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९५३

जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९४०

रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१८४०

बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६५

देवकी पंडीत – गायिका

१९४९

शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी

१४७५

मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

>नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती
(जन्म: ? ? ????)

१९९९

सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते
(जन्म: ? ? ????)

१९९२

रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ‘स्वामी’कार
(जन्म: ८ एप्रिल १९२८)

१९८२

रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष
(जन्म: ९ जुलै १९२१)

१९८२

अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या
(जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९८१

गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य
(जन्म: ? ? ????)

१९७३

पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका
(जन्म: २६ जून १८९२)

१९६७

स. गो. बर्वे – कर्तबगार प्रशासक
(जन्म: ? ? ????)Pageviews

This page was last modified on 17 October 2021 at 9:46pm