हा या वर्षातील ८१ वा (लीप वर्षातील ८२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’
१९७० : हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
१९४५ : अरब लीगची स्थापना
१९३३ : डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.
१७३९ : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२४ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)
१७९७ : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू: ९ मार्च १८८८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९)
१९८४ : प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार (जन्म: ? ? १९०९)
१८३२ : योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी. गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 11 January, 2014 13:23