-: दिनविशेष :-

२७ आक्टोबर

World Day for Audiovisual Heritage

पुर्वीच्या काळी आपल्या देशात कोणी आजारी पडल्यावर वैद्य किंवा हकिमांचे औषध घेत असत. मात्र १७५० नंतर इंग्रज डॉक्टर भारतात व्यवसाय करू लागले. पुण्यात सवाई माधवरावांच्या काळात डॉ. क्रूसो, डॉ. फिन्डले आदी डॉक्टरांनी पुण्यात दवाखाने काढले होते. १७७३ मधे तर एक इंग्लिश डॉक्टर पेशव्यांच्या दरबारात पगारी नोकरीवर होता.

महत्त्वाच्या घटना:

१९९१

तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९८६

युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

१९७१

डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

१९६१

मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५८

पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

१९४७

जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८४

इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू

१९७७

कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६४

मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९५४

अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका

१९४७

डॉ. विकास आमटे – समाजसेवक

१९२३

अरविंद मफतलाल – उद्योगपती
(मृत्यू: ३० आक्टोबर २०११)

१९२०

के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)

१९०४

जतिन दास
१९२९ मधील छायाचित्र

जतिंद्रनाथ तथा ‘जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक
(मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)

(Image Credit: Wikipedia)

१८७४

भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी
(मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)

१८५८

थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: १४ सप्टेंबर १९०१ ते ४ मार्च १९०९), नोबेल शांतता पारितोषिक (१९०६) विजेते
(मृत्यू: ६ जानेवारी १९१९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००७

सत्येंद्र शर्मा तथा सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता
(जन्म: ७ फेब्रुवारी १९३१ - पतियाळा, पंजाब)

२००१

भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ‘फास्टर फेणे’ आणि ‘बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक
(जन्म: ३१ मे १९१०)

२००१

प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता
(जन्म: ४ जानेवारी १९२५)

१९८७

विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक
(जन्म: १२ आक्टोबर १९११)

१९७४

चक्रवर्ती रामानुजम – अंकशास्त्र आणि बैजिक भूमिती या क्षेत्रांत संशोधन केलेले भारतीय गणिती (श्रीनिवास रामानुजन नव्हे)
(जन्म: ९ जानेवारी १९३८)

१९६४

वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक
(जन्म: २६ आक्टोबर १८९१)

१९३७

‘संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु
(जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)

१७९५

सवाई माधवराव पेशवा
(जन्म: १८ एप्रिल १७७४)

१६०५

अकबर – तिसरा मुघल सम्राट
(जन्म: १४ आक्टोबर १५४२)Pageviews

This page was last modified on 11 September 2021 at 10:09pm